Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार, बदनामीची भीती दाखवून उकळले १ कोटी

मुंबई :- डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार, बदनामीची भीती दाखवून उकळले १ कोटी
 

डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बदनामीची भीती दाखवून विवाहित प्रियकराने आतापर्यंत एक कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. २१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. 

ती विवाहित असून एक मुलगी असल्याचे त्याला माहीत होती. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. काही महिने सर्व सुरळीत सुरू असताना तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्यानंतर दोघांच्या संबंधाविषयीची माहिती नातेवाईक, मित्रमंडळींना देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या धमकीनंतर त्याने तिच्याकडून एक कोटी रुपये उकळले होते. याचदरम्यान तिला अवैझ हा विवाहित असून त्याने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.