धन्वंतरी यागास सुधीरदादा गाडगीळ यांची भेट राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त सांगलीत आयुर्वेद व्यासपीठातर्फे उपक्रम
सांगली, दि.२९: आयुर्वेदाच्या प्रसारासाठी तसेच आयुर्वेदाची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि संबंधित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू ,अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेतर्फे मंगळवारी श्री धन्वंतरी याग करण्यात आला. येथील श्री गणेश मंदिर परिसरातील या उपक्रमास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. आयुर्वेद व्यासपीठ लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी करीत असलेल्या कामाबद्दल सुधीरदादांनी समाधान व्यक्त केले.आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेद क्षेत्रात काम करणारी नोंदणीकृत राष्ट्रव्यापी संघटना आहे. सेवा, संगोपन, प्रचार आणि शिक्षण या चतु:सूत्रीस अनुसरून संघटनेमार्फत संपूर्ण देशभरात विविध पातळीवर सेवाकार्य केले जाते. या संघटनेची सांगली जिल्हा शाखा आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी व विविध समाजोपयोगी कार्यासाठी गेली २५ वर्ष शहर व जिल्ह्यात अविरत कार्यरत आहे.
आज या धन्वंतरी यागामध्ये १०८ आयुर्वेदिक वनस्पतींची आहुती देण्यात आली. आयुर्वेदातील संकल्पनेनुसारच हा याग करण्यात आल्याचे डॉ. रवींद्रकुमार माने यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे आणि सर्वांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी आमदार गाडगीळ यांनी यावेळी प्रार्थना केली.
यावेळी सुधीरदादा गाडगीळ यांनी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी तसेच आयुर्वेदाचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सांगलीतील वैद्यराज दातार पंचभौतिक चिकित्सा केंद्रास मदत करण्यासाठी तसेच गावभागातील चौकाला वैद्यराज दातार यांचे नाव दिले जावे यासाठी सुधीरदादांनीच पुढाकार घेतल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.उपस्थित सर्व डॉक्टर्स ( वैद्य) यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना निवडणुकीत विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अध्यक्ष वैद्य रवींद्रकुमार माने, समन्वयक वैद्य योगेश माईणकर, कार्यवाहक वैद्य शिवकांत पाटील, तसेच वैद्य मल्हार जोशी, प्रदीप मादनाईक, अनिरुद्ध कुलकर्णी, महेशकुमार ढाणे, अद्वैत वझे, ऋषिकेश कुलकर्णी, ममता मादनाईक, अश्विनी माने, विद्या बेटगिरी, आरती पडसलगीकर, सुप्रिया कुलकर्णी, दीप्ती कुलकर्णी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
सांगली : राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त येथे मंगळवारी आयोजित धन्वंतरी यागास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.