श्री रावसाहेब पाटील यांच्या जैन महामंडळ सदस्य निवडीचा सन्मान
महाराष्ट्र राज्यातील जैन अल्पसंख्यांक समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्य पदी तीर्थकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे.
या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने प्राचार्य डीडी चौगुले सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी श्री डीडी चौगुले सर यांनी श्री रावसाहेब पाटील यांनी विविध संस्थात केलेल्या संस्थावर्धक कार्याचा आढावा घेतला आणि त्यांची निवड जैन समाजाच्या उन्नतीसाठी लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला
या सत्कार प्रसंगी श्री रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि समाजातील सर्व घटकांना या महामंडळाच्या वतीने त्यांना लाभ मिळावे यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.या सत्कार समारंभास संस्थेचे उपाध्यक्ष श्री पोपटलाल डोरले, सेक्रेटरी श्री अजित प्रसाद पाटील, संचालक सर्वश्री मिलिंद भिलवडे, श्री सुदर्शन शिरोटे, प्रशांत अवधूत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे सूत्रसंचालन प्राचार्य किरण वाडकर सर यांनी केले तर मुख्याध्यापिका सौ निर्मला मोटे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.