Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?

एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
 

लोकप्रिय निर्मात्या एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीडिया रिपोर्टनुसार ALT बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'गंदी बात' या वेबसीरिजमध्ये दाखवलेल्या एका दृश्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 'गंदी बात' वेबसीरिजमधील ६ व्या एपिसोडमध्ये नाबालिक मुलींचं अश्लील दृश्य दाखवल्याने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय प्रकरण नेमकं?
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ दरम्यान ALT बालाजी वर स्ट्रीम होणाऱ्या वेबसीरिजमधील एका एपिसोडमध्ये मुलींचं अश्लील दृश्य दाखवण्यात आलंय. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या हा एपिसोड या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आलाय. याशिवाय या वेबसीरिजमध्ये महापुरुष आणि संत सिगारेटची जाहीरात करताना दाखवण्यात आले असून त्यांचा अपमान केलाय. त्यामुळे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.

याशिवाय वेबसीरिजमधील एका एपिसोडमध्ये POCSO कायद्याच्या नियमांंचं उल्लंघन केलंय. याशिवाय इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी Act 2000, वुमन प्रोहिबिशन Act 1986 आणि सिगरेट्स-अन्य तंबाखू उत्पाद अधिनियम 2003 या कायद्यांचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केलाय. बोरीवलीमधील एमएचबी पोलीस ठाण्यात निर्माती शोभा कपूर आणि एकता कपूर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळणार, एकता-शोभा यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.