देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या टोपच्या तरूणाला अटक
दोन काडतुसेही जप्त, इटकरे फाट्यावर सांगली एलसीबीची कारवाई
सांगली
वाळवा तालुक्यातील इटकरे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या टोप (ता. हातकणंगले) येथील तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
नयन लक्ष्मण पाटील (वय २१, रा. नारायणटेक, टोप, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अवैधरित्या अग्नीशस्त्रे, हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन शिंदे यांचे एक पथक तयार केले होते. पथक शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत असताना एक तरूण इटकरे फाटा येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता.
इटकरे फाट्यावर थांबलेल्या तरूणाचा संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. ती जप्त करून हत्यार बाळगण्याचा परवाना नसल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, संदीप शिंदे, सचिन धोत्रे, अरूण पाटील, अभिजित ठाणेकर, दीपक गट्टे, रोहन गस्ते, अजय पाटील, करण परदेशी, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.