केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा.
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याच्या वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात त्यांचे जूने मित्र भेटले.
कोल्हापूर पोलीस दलात कर्तव्यास असणारे कोल्हापुरच्या तालमीतील मित्र शहाजी पाटील अचानक मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर आले. यावेळी मित्र शहाजी पाटील दिसताच मोहोळांनी आपला ताफा थांबवत त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या काही वेळ संवादही झाला.
इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट मोहोळ यांच्यासाठी सुखत धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट मोहोळ यांच्या क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या या भेटीचा व्हिडीओ देखील सोशल मीडीयावर चांगलचा व्हायरल होत आहे. दोन मित्रांची इतक्या वर्षांनी झालेली भेट हे पाहून आता सगळेच जण भारावून गेले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.