Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबानींच्या घरच्या लाडूंची व्हायरल चर्चा, पाहा 'अंबानी लाडू' करण्याची शाही रेसिपी, दिवाळी स्पेशल...

अंबानींच्या घरच्या लाडूंची व्हायरल चर्चा, पाहा 'अंबानी लाडू' करण्याची शाही रेसिपी, दिवाळी स्पेशल...
 

अंबानी  घराण्याचा शाही थाटमाट तर आपण सगळेच ओळखून आहोत. अंबानी म्हटलं की त्यांची प्रत्येक गोष्ट ही रॉयल असणारच, यात शंका नाहीच. त्यांचे कोणतेही फंक्शन असो किंवा त्या फंक्शन मधील पदार्थ असो यांची कायम चर्चा होतच असते.

नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातील अनेक गोष्टी व्हायरल झाल्या होतात. याचप्रमाणे सध्या सोशल मिडीयावर अनंत अंबानी यांना आवडणाऱ्या आणि अंबानींच्या घरी तयार केल्या जाणाऱ्या खास अंबानी लाडूंची रेसिपी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनंत अंबानी यांनी एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यांना आवडणाऱ्या अंबानी लाडूच्या रेसिपी बद्दल सांगितले होते

दिवाळी  म्हटलं की रोषणाई आणि गोडाधोडाचे पदार्थ खाण्याचा सण. या सणादरम्यान आपण अनेक प्रकारचे फराळाचे गोड पदार्थ आणि मिठाया खातो. आपल्यापैकी काहीजण गोड खाण्याचे शौकीन असतात. काहींना फराळातील गोड पदार्थ म्हणजे लाडू आवडतात. दिवाळीसाठी आपण बेसन किंवा रव्याचे लाडू करतोच. पण यंदाच्या दिवाळीत लाडूचा  खास वेगळा प्रकार करुन पाहायचा असेल तर आपण हे व्हायरल 'अंबानी लाडू' नक्की ट्राय करुन पाहू शकता. 'अंबानी लाडू' कसे करायचे याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :-
१. काजू - १ कप
२. बदाम - १ कप
३. पिस्ता - १ कप
४. मखाणे - ३ कप
५. तूप - ३ ते ४ टेबलस्पून
६. मनुका - १ कप
७. बेदाणे - १ कप
८. भोपळ्याच्या बिया - १ कप
९. खजूर - २ कप
१०. खसखस - १ टेबलस्पून (हलकेच भाजून घेतलेली)
कृती :-

१. सगळ्यातआधी काजू,बदाम, पिस्ता कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
२. मखाणे हलकेच भाजून ते मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यावी.
३. आता एका मोठ्या कढईत तूप घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक तुकडे करुन घेतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मखाण्याची पावडर घालावी. ते तूपात खमंग परतून घ्यावे. हे मिश्रण भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी त्यात मनुके, बेदाणे, भोपळ्याच्या बिया घालाव्यात. हे मिश्रण कढईतून काढून एका मोठ्या डिशमध्ये काढून ठेवावे.

कृती :-
१. सगळ्यातआधी काजू,बदाम, पिस्ता कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
२. मखाणे हलकेच भाजून ते मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यावी.
३. आता एका मोठ्या कढईत तूप घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक तुकडे करुन घेतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मखाण्याची पावडर घालावी. ते तूपात खमंग परतून घ्यावे. 
4. हे मिश्रण भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी त्यात मनुके, बेदाणे, भोपळ्याच्या बिया घालाव्यात. हे मिश्रण कढईतून काढून एका मोठ्या डिशमध्ये काढून ठेवावे.


४. खजूराच्या बिया काढून खजूर वेगळे करून घ्यावेत. हे खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत.
५. एका कढईत तूप घेऊन त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेले खजूर आणि खसखस घालून ते ५ मिनिटे परतून घ्यावे. हे मिश्रण परतून झाल्यावर यात आधी भाजून घेतलेले ड्रायफ्रुटसचे मिश्रण घालून सगळे मिश्रण पुन्हा एकदा एकत्रित करून तूपात परतून घ्यावे.
६. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावे आणि मिश्रण थोडे गरम असतानाच हाताला थोडेसे तूप लावून पटकन लाडू वळून घ्यावेत.
अंबानी लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.