अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
यूपीच्या ज्योती मौर्याप्रमाणेच प्रीती कुमारीची चर्चा देखील आता जोरदार रंगली आहे. गया येथील एका मजुराची मोठी फसवणूक झाली आहे. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल झाल्याबरोबर पत्नी प्रीती कुमारीने पती मिथिलेश कुमारला सोडलं. मिथिलेशने खूप मेहनत करून प्रीतीला शिकवलं होतं. मात्र प्रीतीला नोकरी लागताच तिने आपल्या मजूर पतीला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. त्यांना एक 6 वर्षांचा मुलगाही आहे.
हे प्रकरण गयाच्या शेरघाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामपूर पंचायतीच्या भुजौल गावातील आहे. मिथिलेशने सांगितलं की, प्रीती झारखंडमधील हंटरगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते, पण बोधगया बीएमपीमध्ये नोकरी मिळाल्यानंतर प्रीतीच्या वागण्यात खूप बदल झाला. आता ती फोन उचलत नाही आणि भेटू इच्छित नाही.
मिथिलेश आणि प्रीतीने लव्ह मॅरेज केलं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. हताश झालेल्या मिथिलेशने गया एसएसपीकडे लेखी तक्रार केली आहे. पत्नीला त्याच्याकडे परत आणण्याची विनंती त्याने एसएसपीकडे केली आहे. मिथिलेश म्हणाला, मी खूप मेहनत केली, माझ्या पत्नीला शिकविले आणि नोकरी मिळवण्यासाठी खूप काही केले, पण आता नोकरी मिळाल्यानंतर तिने मला सोडलं. ती माझ्याकडे येत नाही.या प्रकरणी बोधगया बीएमपीमध्ये तैनात असलेल्या प्रीती कुमारी या महिला कॉन्स्टेबलचं काही वेगळेच म्हणणं आहे. तिचा पती मिथिलेश हा हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. प्रीती कुमारी म्हणाली की, आता ती मिथिलेशसोबत राहणार नाही. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मिशिलेशने सांगितलं की, प्रीतीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २०१२ मध्ये तिचा मुलाशी घटस्फोट झाला होता, त्यानंतर ती त्याच्यासोबत राहू लागली आणि त्यानंतर २०१७ मध्ये एका मंदिरात त्यांनी लग्न केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिथिलेशला आशा आहे की, त्याला न्याय मिळेल आणि त्याची पत्नी त्याच्याकडे परत येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.