गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या जिल्हा न्यायालयात मोठा राडा पहायला मिळाला. वकील आणि न्यायाधीशांचा वाद एवढा वाढत गेला की पोलिसांना लाठीचार्ज करून न्यायाधीशांना बाहेर काढावे लागले आहे.
वकील नहर सिंह यादव आणि त्यांच्या साथीला असलेल्या वकिलांचा न्यायाधीशांशी वाद झाला. हा वाद एवढा पेटला की जिल्हा न्यायालयातील अन्य वकीलही तिथे हजर झाले. प्रकरण हमरीतुमरीवर येताच न्यायाधीशांनी पोलिसांना बोलविले. परंतू, वकिलांची संख्या एवढी मोठी होती की दुपारी बाराच्या सुमारास अन्य पोलिस ठाण्यांच्या पोलिसांना तिथे पाचारण करण्यात आले.
वकील न्यायाधीशांना सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला व न्यायाधीशांना वकिलांच्या गराड्यातून बाहेर काढले. या सगळ्या गोंधळात कोर्टाचे कामकाज बंद पडले आहे. तसेच पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये नाहर सिंह आणि अन्य एक वकील जखमी झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.