Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
 

स्वार्थासाठी अनेकवेळा संजयकाकांनी गट तट बदलला आहे. लोक सद्सकविवेद बुद्धीला धरुन मतदान करतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर केलीय.

सत्तेचा माज आलेला नेता आता विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढेल. जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार अशा शब्दात खासदार विशाल पाटील यांनी देखील संजय काका पाटील यांच्यावर टीका केली. 

विधानसभेच्या पराभवानंतर संजयकाका पाटील तासगावची नगरपरिषद लढतील

सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील. सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत असे विशाल पाटील म्हणाले. 

संजयकाका पाटलांचा मोठ्या फरकानं पराभव होणार

संजय काका पाटील यांचा रोहित पाटील यांच्या विरोधात खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी जनतेने उतरले आहे तरीदेखील त्यांना अजून हवा आहे. इतके दिवस सांगत होते की प्रभाकर पाटील आमदार होणार. जो सत्तेसाठी पोराला बाजूला करून स्वतः नेऊन लढतो तो जनतेसाठी काय करणार? स्वतःच्या पोरासाठी जो थांबू शकत नाही. हे जनता आता जाणून आहे. रोहित पाटील हे आमच्यासाठी राबले आहेत. आता आमच्यावर पैरा फेडण्याची वेळ आलीये. 

अजितराव घोरपडेंनी कोणत्या दबावामुळं संयकाकांना पाठिंबा दिला हे माहिती नाही

कोणत्या अडचणीमुळे अजितराव घोरपडे यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दिला हे माहीत नाही. पण मी अजितराव घोरपडे यांना विनंती करणार आहे की ज्या भुताला काढण्यासाठी आपण एकत्र आलो. त्या भुताला पुन्हा डोकं वर आणू देऊ नका असं मी त्यांना सांगितलं आहे. पण अजितराव घोरपडे यांनी कोणत्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला हे माहीत नाही. पण अजितराव घोरपडे यांचे कार्यकर्ते तरुण उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे विशाल पाटील म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.