Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या गोष्टी तुम्हीच सोडवा, दिल्लीत आणू नका', अमित शाहांची भाजप नेत्यांना तंबी

'या गोष्टी तुम्हीच सोडवा, दिल्लीत आणू नका', अमित शाहांची भाजप नेत्यांना तंबी
 

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातले काही प्रमुख नेते अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. महायुतीच्या या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांमधला जागावाटपाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

बंडखोरी राज्यातच रोखा

भाजपमध्ये बंडखोरी न होऊ देण्यावर भाजपच्या नेत्यांचा भर आहे. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्याप्रकारे समजूत काढा. राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी टाळण्यासाठी बंडखोरी रोखा. बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न केरा. या बंडखोरांवर राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं, अशा सूचना अमित शाह यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.

किती जागांवर तिढा?

महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आतापर्यंत त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या 99, शिवसेनेच्या 45 आणि राष्ट्रवादीच्या 38 अशा एकूण 182 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. उरलेल्या 106 जागांपैकी 22 जागांवर वाद कायम असून यापैकी साधारण 7 जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या 22 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीनंतर महायुतीच्या बहुतांश जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.