बीड : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे मैदानात कोण कोण आहे, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
त्यांच्याविरोधात यावेळी करुणा शर्मा यांनी अर्ज दाखल केला. पण, शेवटच्या दिवशी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. करुणा शर्मा यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.
मध्यंतरीच्या काळात करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे करुणा शर्मा यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धनंजय मुंडे यांचाही हाच मतदारसंघ आहे. यात मतदारसंघात करुणा या अपक्ष म्हणून धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढणार होत्या.मात्र, करुणा शर्मा यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्या व्यक्तीचे नाव होते त्याने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. करुणा शर्मा यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने स्वाक्षरी केली नसल्याचं सांगितलं, त्यामुळे तो अर्ज बाद ठरवला आहे, असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अर्ज बाद झाल्यामुळे करुणा मुंडे कमाली संतापल्या. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. बीडचा विकास करण्याच्या नावाखाली धनंजय मुंडेंनी पैशांची उधळपट्टी केली आहे. लोकांचे पैसे त्यांनी मुंबई उडवले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची फॅक्टरी आहे. ही घराणेशाही सुरू आहे. ती संपवण्यासाठी मी बीडमध्ये आली आहे. मी मागे विष घेण्याचा प्रयत्न केला होता. आताही त्यांना असंच वाटतंय. पण मी आता विष घेणार नाही, मी लढा देईल, अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली.
होम पीचवर धनंजय मुंडे यांना घेरण्याची शरद पवार गटाची खेळी
बीडच्या परळी मतदारसंघात शरद पवारांनी काँग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी जातीय समीकरण साधण्यासाठी पवारांनी मराठा कार्ड खेळले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात उतरलेल्या धनंजय मुंडे यांना घेण्यासाठी आता शरद पवारांनी तयारी पूर्ण केल्याचे दिसत आहे. परळी मतदारसंघातील ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असेच चित्र दिसू शकणार आहे. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनेक उमेदवार इच्छुक होते. परंतु शरद पवारांनी मराठा कार्डला प्राधान्य देत काँग्रेसच्या नेत्याला पक्षात घेत संधी दिल्याने याची चर्चा होत आहे. राजसाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे परळीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.