Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

22 वर्षांचा तरुण, ज्याला भुलले लोक; त्याच्यावर 2200 कोटी रुपये उधळले

22 वर्षांचा तरुण, ज्याला भुलले लोक; त्याच्यावर 2200 कोटी रुपये उधळले
 
 
नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणुकीतून पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडतात. हर्षद मेहताने शेअर बाजारात सर्वांत मोठा घोटाळा केला होता. या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली होती.

आसामचा एक तरुण फसवणूक करण्याच्या बाबतीत हर्षद मेहतापेक्षा वरचढ निघाला. या तरुणाने लोकांना 2200 कोटी रुपयांना गंडा घातला. हा तरुण कोण आहे आणि त्याने लोकांची कशी फसवणूक केली ते सविस्तर जाणून घेऊ या.

हर्षद मेहता ही अशी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने शेअर बाजारात खूप मोठा घोटाळा केला होता. 1992मध्ये सिक्युरिटीज घोटाळ्यामुळे शेअर बाजार कोसळला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचं नुकसान झालं. आसाममधला 22 वर्षांचा तरुण फसवणुकीच्या बाबतीत हर्षद मेहतापेक्षा वरचढ निघाला. बिशाल फुकन नावाच्या या तरुणाने लोकांना 2200 कोटी रुपयांना फसवलं.

आसाममधल्या डीबी स्टॉक नावाच्या ब्रोकिंग कंपनीत अवैध काम सुरू असल्याचं उघड होताच कंपनीचा मालक दीपांकर बर्मन फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी बनावट स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध मोहिम उघडली. त्यामुळे घाबरलेल्या बिशालने सोशल मीडियावर असा दावा केला, की 'मी कोणत्याच गुंतवणूकदारांचे पैसे खाल्लेले नाहीत. सर्व गुंतवणूक सुरक्षित आहे.' त्यानंतर पोलिसांना बिशालचा संशय आला. त्यांनी बिशालच्या घरावर छापा टाकला आणि नंतर व्यवस्थापक बिप्लवसह बिशालला अटक केली. अशा पद्धतीने बिशाल फुकनचा भांडाफोड झाला.
बिशाल हा आसामच्या दिब्रुगड शहरातला रहिवासी आहे. तो ऑनलाइन ट्रेडर होता. त्याने लोकांना फसवण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली. त्यासाठी त्याने स्वतःला मेंटेन करण्यासाठी बरेच पैसे खर्च केले. महागड्या गाड्यांमधून फिरणं, महागडे कपडे परिधान करणं हे त्याचे छंद होते. स्वतःची आलिशान लाइफस्टाइल लोकांना दाखवण्यास त्याने सुरुवात केली.

ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे इतके पैसे कमावतो की ही आलिशान लाइफस्टाइल सहज मेंटेन करता येते, असं तो लोकांना सांगू लागला. त्यामुळे शेअर बाजारात पैसे गुंतवून प्रत्येक जण आलिशान जीवन जगू शकतो, असं बिशालने सर्वांच्या मनावर बिंबवलं. असं जीवन जगायचं असेल तर शेअर बाजारात पैसे गुंतवावे लागतील, असं तो सांगू लागला. तसंच त्याने कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासनदेखील दिलं. अनेक जण त्याच्या प्रभावी बोलण्याला भुलले आणि त्याच्या जाळ्यात अडकले. त्याने केवळ आसामच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशातल्या कित्येक जणांची फसवणूक केली. त्या फसवणुकीचा आकडा 2200 कोटी रुपये आहे.
गुंतवलेल्या पैशातून 60 दिवसांत 30 टक्के रिटर्न मिळेल असं बिशाल सांगू लागला. एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपये गुंतवले तर त्याला दोन महिन्यांत 30,000 रुपये रिटर्न म्हणून मिळतील. हे समजताच लोक बिशालच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी डोळे झाकून पैसे गुंतवले. अशा प्रकारे त्याने भरपूर पैसा जमवला आणि त्यातून चार कंपन्या उभारल्या. यात फार्मास्युटिकल्स, प्रॉडक्शन आणि कन्स्ट्रक्शन उद्योगाचा समावेश होता. याशिवाय बिशालने आसामी चित्रपटसृष्टीत भरपूर पैसा गुंतवला, असं वृत्त 'एशियानेट न्यूज'ने दिलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.