1 बंदूक, 9 गोली, 4 मृतदेह, 1 FIR नं सगळं संपवलं; कुटुंबाच्या हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं
लोकांना काही संकट जाणवलं किंवा एखाद्यापासून त्रास जाणवला की ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि एफआयआर नोंदवतात. पण हाच एफआयआर एका कुटुंबाच्या मृत्यूचं कारण बनलंय. ज्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आणि आता या हत्याकांडची चर्चा दूरदूरच्या गावात पोहोचली आहे.
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की असं नक्की झालंय तरी काय?
भवानी नगरच्या मुख्य चौकात असलेल्या घरात अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घरात गेले तेव्हा त्यांना सुनील आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह अंगणात पडलेले दिसले. तर दुसऱ्या खोलीत त्यांच्या दोन निष्पाप मुलांचे मृतदेह पडले होते.घटनास्थळावरून पोलिसांनी 9 गोळ्यांचे खंदे जप्त केले आहेत. या हत्येतील आरोपी चंदन वर्मा याला ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चंदन वर्माने एकट्याने ही निर्घृण हत्या केल्याचेही बोलले जात आहे.
सुनील हा मूळचा रायबरेली जिल्ह्यातील गडगंज भागातील रहिवासी होता. नुकतीच त्यांची अमेठी येथे बदली झाली. सुनिलची बायको पूनमने चंदनविरोधात एफआयआर दाखल केला होता. प्राथमिक पोलिस तपासात असे दिसून आले आहे की पूनमने 18 ऑगस्ट रोजी रायबरेली येथे चंदन वर्मा विरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 अंतर्गत आणि विनयभंगाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला होता. चंदन वर्मा यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला काही झालं तर ते जबाबदार असतील, असंही या तक्रारीत म्हटलं आहे.
'माझ्या दुसऱ्या मुलाला नोकरी मिळावी' असं सुनीलच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली, "माझा मोठा मुलगा गेल्यानंतर माझ्याकडे कमावणारे कोणी नाही. माझे वय 60 पेक्षा जास्त आहे. मला दुसरा मुलगा आहे जो वेगळा राहतो. त्याला नोकरी मिळाली तर बरं होईल.'सुनिलचे वडिल म्हणाले की चंदन वर्मा कोण आहे हे मला माहीत नाही? येथील शवागाराबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मी हरिजन आहे आणि तो कोणत्या जातीचा आहे हे मला माहीत नाही.' त्यांनी सांगितले की, एकदा त्यांच्या सुनेने त्यांना सांगितले होते की, तिने वर्माविरोधात तक्रार दाखल केली होती पोलिस, पण काही झाले नाही. कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.