Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Post Officeच्या 3 वर्षांच्या FDत जमा करा 5 लाख; मॅच्योरिटीवर किती मिळतील?

Post Officeच्या 3 वर्षांच्या FDत जमा करा 5 लाख; मॅच्योरिटीवर किती मिळतील?
 

मुंबई : आजकाल बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बँका, म्युच्युअल फंड आणि पोस्ट ऑफिस बचतीसाठी सातत्याने नवीन योजना लाँच करत असतात. तुम्ही या योजनांचा लाभ घेत ठराविक रक्कम डिपॉझिट करून व्याजाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

बाजारात अनेक वित्तीय संस्थांच्या बचत योजना उपलब्ध असल्यातरी त्यात जोखीम हा घटक महत्त्वाचा असतो. त्यामुळे बहुतांश लोक सरकारी बँका, पोस्ट ऑफिसमधील बचत, डिपॉझिट योजनांना प्राधान्य देतात. एफडी करून तुम्ही जर उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षांच्या मुदतीसाठी ठराविक रक्कम जमा केली तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला किती रक्कम मिळू शकते, हे सविस्तर जाणून घेऊया.
बचतीसाठी पोस्ट ऑफिस हा अत्यंत खात्रीशीर पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीकरिता डिपॉझिटच्या योजना आहेत. तुम्ही या योजनांना एफडी असं म्हणू शकता. तुम्ही पोस्टाच्या एफडी योजनेत किमान 100 रुपयांपासून ते कमाल कितीही रक्कम ठेवू शकता. पोस्टाच्या एक वर्षाच्या एफडीसाठी 6.9 टक्के, दोन वर्षांसाठी 7 टक्के, तीन वर्षांच्या एफडीसाठी 7.1 तर पाच वर्षांच्या एफडीसाठी 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे.
याबाबत उदाहरण पाहू. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षांसाठी पाच लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 6,17,538 रुपये मिळतील. यात 1,17,538 रुपये हे व्याजातून मिळणारे उत्पन्न असेल. तुम्ही या एफडीचा कालवधी आणखी तीन वर्षांसाठी वाढवला तर मॅच्युरिटी वेळी तुम्हाला 7,62,705 रुपये मिळतील. यात 2,62,705 रुपये हे व्याजातून मिळालेलं उत्पन्न असेल. याचा अर्थ पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत तुम्ही ठराविक रक्कम ठेवली तर त्यातून तुम्हाला व्याजाच्या स्वरुपात चांगली कमाई करता येऊ शकते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.