Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही? संकेत बावनकुळेची मेडिकल का केलं नाही? सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर पोलिसांचं स्पष्टीकरण, म्हणाले, 'घटनास्थळी...'

गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही? संकेत बावनकुळेची मेडिकल का केलं नाही? सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर पोलिसांचं स्पष्टीकरण, म्हणाले, 'घटनास्थळी...'
 

नागपूर: नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण तापत असल्याचं चित्र आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नागपुरातील सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.

त्यांनी या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत काही प्रश्न देखील विचारले आहे. जेव्हा एखादा अपघात घडतो किंवा अशी काही घटना होते, तेव्हा ती गाडी पोलिस ठाण्यात नेली जाते, मात्र बावनकुळेंच्या मुलाची गाडी ही गॅरेजमध्ये नीट करण्यासाठी देण्यात आल्याचं अंधारेंनी पोलिसांना विचारलं यावेळी पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की जी काही कार्यवाही करायची ती केली जात आहे. त्याचबरोबर अंधारेंनी नागपूर अपघातातील गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही? अपघातग्रस्त गाडी गॅरेजमध्ये का पाठवली? संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही? असे अनेक सवाल नागपूर पोलिसांना केले आहेत. त्यावर पोलिसांनी माहिती देखील दिली आहे. 

गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही?

त्यानंतर अंधारेंनी पोलिसांना या प्रकरणी गाडीचा नंबर FIRमध्ये नोंद केला नसल्याचंही म्हटलं, त्याचबरोबर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही अंधारेंनी दावा केला आहे. आधी तर गाडी नाही असं म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर प्रकरण समोर आलं तेव्हा गाडीत कोण्या राजकीय नेत्याचा मुलगा होता हे समोर आलं, त्यानंतर त्या कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याची माहिती समोर आली. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माझा मुलगा गाडीत नव्हता असं म्हटलं होतं, घटना घडून गेल्यानंतर ३६ तासांनी तुम्ही या घटनेबाबत पत्रकार परिषद घेता. त्यावेळी सांगता गाडीत संकेत बावनकुळे होता. त्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी सांगितलं मुलगा गाडीत होता पण मागे बसलेला होता, एकदा संकेत बावनकुळे पुढे बसतो, मागे बसतो, नागपुरात ३५०० सीसीटिव्ही आहेत, याचा अर्थ त्या गाडीने प्रवास केला त्या ठिकाणचे फुटेज तपासले का याबाबतचे प्रश्न अंधारेंनी पोलिसांसमोर उपस्थित केले आहेत. 

गाडी कोण चालत होतं?

यावर स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितलं, आम्ही घटना घडली त्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे, त्यातून कोण कार चालवत होतं, ते निष्पन्न झालं आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, असं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे. 

लोहोरी बारचे फुटेज पोलिसांकडे

तर त्या लोहोरी बारचे फुटेज पोलिसांकडे आहे. त्यातील किती जणांचं मेडिकल करायला घेतलं आहे, असा सवाल यावेळी अंधारेंनी केला त्यावर पोलिसांनी दोघांचा अशी माहिती दिली. त्यावर दोघांचं का असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे. संकेत बावनकुळेंचं मेडिकल का नाही केलं, त्यावर पोलिसांनी सांगितलं, घटनेनंतर दोघेजण सापडले, संकेत तिथून पळून गेला होता. १२ तास उलटून गेल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांचा काहीही उपयोग होत नाही. या कारणामुळे आम्ही संकेतची वैद्यकीय चाचणी केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिस या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज देणार नसल्याची माहिती

त्याचबरोबर पोलिस या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या अवघ्या काही मिनिटापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. त्यामध्ये अर्जुन हावरे गाडी चालवत असून शेजारी संकेत बावनकुळे आणि पाठीमागे रोनित चींतमवार बसलेला आहे. हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सुषमा अंधारेंनी अपघात घडवणाऱ्या ऑडीची पाहणी केली. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात अपघात घडवणारी ऑडी दोन दिवसापासून उभी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.