Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BSNL जोमात इतर कंपन्या कोमात! ऑफिसमध्ये राहुनही फोनमध्ये चालेल घरातील WiFi

BSNL जोमात इतर कंपन्या कोमात! ऑफिसमध्ये राहुनही फोनमध्ये चालेल घरातील WiFi
 

मुंबई : BSNL एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरापासून दूर असलात तरीही फायबर कनेक्शनद्वारे हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. 'सर्वत्र' असे या प्रोजेक्टचं नाव असून या प्रोजेक्टने टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रोजेक्टची ट्रायल फेज पहिलेच पूर्ण झाली आहे. लवकरच ही सर्व्हिस केरळ सारख्या परिसरांमध्ये सुरु केली जाईल.


लोक करताय नोंदणी 
 
BSNL जास्तीत जास्त लोकांना या सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जेणेकरून ते या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट जे रवी यांनी 'सर्वत्र' प्रकल्पाची ओळख करून दिली.

हा प्रकल्प का आणला?

या प्रोजेक्टचा उद्देश संपूर्ण भारतातील गावांना हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे. या प्रकल्पाचा एक मुख्य फायदा म्हणजे याच्या मदतीने यूझर्स मोबाईल डेटावर कमी पैसे खर्च करू शकतात.

ते सर्वत्र कसे चालेल?

'सर्वत्र' हे BSNL च्या फायबर टू द होम (FTTH) टेक्नॉलॉजीवर तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये उपलब्ध FTTH कनेक्शन असलेल्या यूझर्सना BSNL ची FTTH सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणांहून इंटरनेटचा वापर करता येईल. हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना 'सर्वत्र' योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल.

सुरक्षित देखील आहे
 
एकदा नोंदणी केल्यानंतर, FTTH कनेक्शन 'सर्वत्र इनेबल' केले जातात. यामुळे दुसऱ्या ठिकाणी वाय-फाय पासवर्ड किंवा युजर आयडीची गरज नाहीशी होते. सर्वत्र पोर्टल व्हर्च्युअल टॉवरसारखे कार्य करते, कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते. बीएसएनएलने युजर्सना आश्वासन दिले आहे की सिस्टम सर्वत्र सुरक्षित आहे. दुसरा मोडेम फक्त एक मार्ग आहे. अचूक सेवा सुनिश्चित करण्यासाठी 'वन नॉक' सिस्टम 24 तास काम करेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.