कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.