Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधानांच्या बुलेट प्रूफ गाडीमध्ये असतात अनेक वैशिष्ट्ये; ऐकाल तर चकित व्हाल

पंतप्रधानांच्या बुलेट प्रूफ गाडीमध्ये असतात अनेक वैशिष्ट्ये; ऐकाल तर चकित व्हाल
 

प्रत्येक देशामध्ये सुरक्षेवर फार लक्ष ठेवले जाते. देशातील मोठमोठया पदांवर विराजमान असणाऱ्या लोकांसाठी खास सुरक्षा दिली जाते. एकंदरीत, देशातील प्रमुख व्यक्तींची सुरक्षा म्हणजे एक प्रकारे देशाचीच सुरक्षा करणे असते. यामुळे, देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच इतर प्रमुख पदावरील व्यक्तींसाठी सुरक्षेच्या बाबीने सगळ्या गोष्टी अगदी तपासानंतर पुरवल्या जातात. या व्यक्तींना फिरण्यासाठी देखील बुलेट प्रूफ गाड्या पुरवल्या जातात.

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच मुकेश अंबानीसारख्या व्यक्तींकडे बुलेट प्रूफचे संरक्षण असणारे गाड्या आहेत. हे व्यक्ती नेहमी अशाच गाड्यांतून फिरतात. पंतप्रधान मोदी अनेकदा त्यांच्या बुलेट प्रूफ रेंज रोवर सेंटिनेलमध्ये दिसून येतात. देशातील या विशेष व्यक्तींच्या विशेष गाड्या फक्त त्यांच्या सुरक्षेचा माध्यम नसून देशाच्या शक्ती आणि अभिमानाची गोष्ट आहे.

देशातील अनेक नेतेमंडळी तसेच मोठमोठे अभिनेते, व्यापारी मंडळी अशा बुलेट प्रूफ गाड्यांमधून फिरत असतात. बुलेट प्रूफ गाड्यांना सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ कवचने झाकले जाते, जेणेकरून एखाद्या हमल्यामध्ये आतील बसलेल्या व्यक्तीला वाचवता येईल. या गाड्यांमध्ये मोठमोठ्या स्फोटापासून वाचण्यासाठी अनोखे तंत्रज्ञान वापरले जाते. ज्याच्या माध्यमातून आतील व्यक्ती सुरक्षित राहतो. या गाड्यांमध्ये बहुतेक सुविधा असतात. या सुविधा साधारणन गाड्यांपेक्षा फार अनोख्या असतात. प्रमुख व्यक्तींना पुरवण्यात आलेल्या बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये आग वीजवण्याचे उपकरण, ऑक्सिजन टॅंक तसेच एमर्जन्सीची वेळी उपयोगी पडणारे अन्य महत्वाचे उपकरण उपलब्ध असतात.
भारतामध्ये पंतप्रधान तसेच राष्ट्र्पती खासकरून स्वदेशी गाड्या वापरतात. स्वदेशी गाड्यांच्या कंपन्यांना देशातील रस्ते तसेच हवामानाचा अंदाज असल्याने त्यांना येथील वातावरणाशी अनुकूल गाडी बनवणे सोपे होते. त्यामुळे PM तसेच राष्ट्रपती भारतीय गाड्यांना पसंती देतात. प्रमुख व्यक्तींच्या या बुलेट प्रूफ गाड्यांचं आतमध्ये लग्जरी वातावरण असते.

सगळ्या गोष्टी अगदी टापटीप असतात. या गाड्या बनवण्यासाठी उच्च क्वालिटीचे सीट्स वापरले जातात, जे बसण्यास अगदी आरामदायक असतात. त्याचबरोबर AC आणीबी लेटेस्ट इन्फोटेनमेंट सिस्टममुळे या गाड्यांना अनोखी बात येते. या गाड्यांमध्ये अत्याधुनिक संपर्क साधने असतात. तसेच सुरक्षा कॅमेरे, अलार्म सिस्टम आणि इतर सुरक्षा उपकरणे असतात. एक्नाद्रित, या गाड्या व्यक्तीच्या सुरक्षेबरोबर आरामदायीतेच्या उद्देशाने बनवल्या जातात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.