जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील प्रसादाबाबत आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय तापमान वाढले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी जगन मोहन रेड्डी सरकारवर (YSRCP) गंभीर आरोप केले आहेत. टीडीपी प्रमुख म्हणाले की,’पूर्वीच्या सरकारमध्ये तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरली जात होती. त्यांच्या या आरोपानंतर राज्यात राजकीय हल्लाबोल आणि पलटवार सुरू झाले आहेत.’
NDA विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नेमकं काय म्हणाले … ‘YSRCP सरकारने जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. आता माझ्या सरकारमध्ये शुद्ध तूप वापरले जात आहे. मात्र, वायएसआरसीपीने नायडूंचा हा आरोप साफ फेटाळून लावला.’
नायडूंनी हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या – सुब्बा रेड्डी
वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि टीटीडीचे माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडू यांचा आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. सुब्बा रेड्डी म्हणाले की, टीडीपी प्रमुख राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि शेकडो कोटी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देऊन मोठे पाप केले आहे.वायएसआरसीपीला भाविकांच्या भावनांचा आदर करता आला नाही
सुब्बा रेड्डी पुढे म्हणाले की,’त्यांनी तिरुपती मंदिराच्या प्रसादावर अतिशय वाईट टिप्पणी केली आहे. माणूस म्हणून जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती अशी टिप्पणी किंवा आरोप करणार नाही. चंद्राबाबू राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकतात, हे त्यांचे आरोप सिद्ध झाले.’
आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी जगन मोहन रेड्डी प्रशासनावर निशाणा साधला. लोकेश यांनी X वर लिहिले की तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे. वायएस जगन मोहन रेड्डी प्रशासनाने तिरुपती प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली हे जाणून मला धक्का बसला. YSRCP करोडो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करू शकत नाही, असा आरोप लोकेश यांनी केला. तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरात तिरुपती लाडू अर्पण केला जातो. मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे प्रशासित केले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.