Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."

"अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."
 

जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मर्लिक यांच्याकडं भारतातील बडे उद्योगपती अंबानी यांची एक फाईल सहीसाठी आली होती. या फाईलबाबत मलिक यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोड़ो अभियान आयोजित जनसभा पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी देखील उपस्थिती लावली.

मलिक म्हणाले, या लोकांनी ठरवलं आहे की शेती संपवायची, सैन्य संपवायचं. सध्या देशात सरकारी एजन्सीजचा गैरवापर सुरू आहे. मी राज्यपाल म्हणून नियुक्ती झालो त्यावेळी दौन फाईल माझ्या समोर आल्या. यामध्ये एक फाईल ही अंबानी यांची होती. त्यात काही चुकीचं नव्हतं म्हणून मी त्यावर कारवाई करण्यास नकार दिला.

त्यावर मला अधिकाऱ्याने सांगितलं की दीडशे कोटी मिळणार आहेत. मी सांगितलं मला काही नकोय. मी असेपर्यंत असं काहीच होणार नाही. मी दिल्लीत सांगितलं की मला असं काही जमणार नाही. तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्या. त्यावर त्यांनी मला सांगितल की बरोबर आहे, भ्रष्टाचाराबाबत निष्काळजीपणा चालणार नाही. पण त्या दिवसापासून माझ्यासोबत त्या अधिकाऱ्यांची वागणूकच बदलली. माझ्या गावच्या घरी सीबीआयची टीम चौकशीसाठी पाठवली गेली. माझ्या काकांची मुलं घरी होती, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की घरात भूत आहेत, त्यानंतर हे अधिकारी पळाले, असा किस्साही यावेळी सत्यपाल मलिक यांनी सांगितला.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर मलिक म्हणाले, देशात जबरदस्त लढाई सुरू आहे आणि आता तुम्ही जिंकण्याच्या जवळ आला आहात. जर तुम्ही पराभूत होणार असता तर हरयाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक लागली असती.

हरयाणात काँग्रेस 60 जागा तर भाजप 20 जागा जिंकणार आहे. मोदी जर विनासुरक्षा गावात गेले तर काही खरं नाही. या लोकांनी सगळं गहाण ठेवलं आहे, अदानीकडं यांना देशाबाबत काळजी नाही, अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.