भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा....
पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच जात आहे. मात्र लवकरच पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारू शकते. कारण भारताच्या शेजारील देशात समुद्रात एक मोठा खजिना सापडला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसचा साठा सापडला असून समुद्राच्या तळाशी सापडलेला हा खजिना इतका मौल्यवान आहे की एका झटक्यातच आर्थिक स्थितीशी झुंझत असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधार येईल. त्याचबरोबर देशातील इंधनदेखील स्वस्त होणार आहे.
बिझनेस टुडेने डॉन या वृत्तत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानचा हा शोध तब्बल तीन वर्षांनी पूर्ण झाला आहे. पाकिस्तानसोबतच आणखी एका देशाने यात संशोधनासाठी मदत केली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणांनंतर हे स्थान चिन्हांकित केले होते. त्यानुसार, संबंधित विभागाने पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रात झालेल्या संशोधनाबाबत सरकारला माहिती दिली.
अधिकारीने पुढे म्हटलं आहे की, ब्लू वॉटर इकोनॉमीचा लाभ घेण्यासाठी मोठी पावलं उचलण्यात येणार आहेत. बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जात असून साठा किती आहे हे निश्चित करुन तो काढण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र, ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात, असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसव्यतिरिक्त समुद्रातून अन्य मौल्यवान खनिजा आणि तत्वे मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर पुढील कारवाईवर जोर देण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला अंदाज लावण्यात येत होता की, हा जगातील चौथा सर्वात मोठा तेल आणि गॅस भंडार असू शकतो. सध्या व्हेनजुएला येथे सर्वात मोठा तेल भंडार असून जवळपास 3.4 बिलियन बॅरल इतकी त्याची व्याप्ती आहे. टॉप पाचमध्ये सौदी अरब, ईराण, कॅनडा आणि इराक यांचा समावेश आहे.
किती रक्कम खर्च होणार?
समुद्रातून हा साठा काढण्यासाठी जवळपास 5 बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यासाठी चार ते पाच वर्ष लागण्याची शक्यता आहे. तसंच, साठा असल्याची पुष्टी झाल्यास इंधनाच्या विहिरी बांधण्यासाठी व ईंधन उप्तादनासाठीच्या सर्व कामांसाठी अधिक गुंतवणुकीची गरज पडणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.