Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! ६ वर्षीय मुलीवर आधी अत्याचार, त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह

महाराष्ट्र हादरला! ६ वर्षीय मुलीवर आधी अत्याचार, त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह
 

नंदूरबार : राज्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहे. बदलापूरनंतर नंदूरबारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नंदूरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवडमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. नंदूरबारमधील या घटनेने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नंदूरबार पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवड येथे खळबळजनक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेची शाळा शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पोलीस विभागाने तातडीने या गुन्ह्याची दखल घेत आरोपीला २४ तासांच्या बेड्या ठोकल्या आहेत. 

नेमकं काय घडलं?
खरवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ६ वर्षीय मुलगी १२ तारखेला शाळेतून घरी परतली नाही. बराच वेळ झाल्यानंतरही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. 

पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पुढील शोध सुरु केला. पोलिसांच्या तपासात मुलगी एका नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसून गेल्याची नोंद सीसीटीव्हीत दिसून आली. त्यानंतर पुढील तपासात मुलीचा मृतदेह एका केळीच्या बागेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.