Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

..तर गाठ माझ्याशी; रोहित पाटलांचा संजयकाकांना इशारा

..तर गाठ माझ्याशी; रोहित पाटलांचा संजयकाकांना इशारा
 

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याची तयारी गेल्या काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

दुसरीकडे जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता सांगलीच्या कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला दम दिल्याने रोहित पाटलांनी माजी खासदार संजयकाका पाटलांना इशारा दिला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले असतानाच कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील  व माजी खासदार संजयकाका पाटलांच्या  कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे रोहित पाटलांनी इशारा दिला आहे. या ठिकाणच्या नगरपंचायत निवडणुकीवरून माजी खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्या कार्यकर्त्यातील वाद चांगलाच रंगला आहे. 

काय करायचे ते विधानसभा निवडणुकीपर्यंत करून घ्या. विधानसभेनंतर तुम्हाला काही करायला देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटलांनी भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिला. त्याच बरोबर यापुढे कार्यकर्त्याच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा देखील रोहित पाटलांनी दिला.

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये आयोजित निषेध सभेमध्ये ते बोलत होते. कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.