Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

..तर कुत्र्याचे मटण खावे लागेल, गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान

..तर कुत्र्याचे मटण खावे लागेल, गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान
 

धनगर आरक्षणासाठी सकल धनगर समाज आक्रमक झाला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) धनगर बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

मात्र, या आंदोलना गोपीचंद यांनी वादग्रस्त विधान केल्याने नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगरांनी मेंढरं, बकरी राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल.

धनगर समजाल आठ-आठ दहा-दहा महिने मेंढरं घेऊन बाहेर राहतो. कुठंय त्याला घर?. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या प्रतिचे मांस मिळावे म्हणून दिवसाला 35 किलोमीटर तो चालतोय. पण कुणाच्या रानात चुकून मेंढरं गेली तर मेंढपाळाला गुराढोरा सारखं मारलं जातं. पोलिस दखल घेत नाही, हा अन्यात आम्ही का सहन करायचा? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

एसटीतून धनगर समाजाला आरक्षण ही आमची पहिली मागणी आहे. धनगराचं पोरंग शिकलं तर त्याला मेढरं संभाळायची वेळ येणार नाही.सरकारच्या बाजुने धनगर उभा राहिला आहे. मतदान करायला आम्ही पाहिजे. सरकारने धनगर समाजाच्या संदर्भात एसटीचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी देखील पडळकर यांनी केली.

आमचा चेअरमन दाखवा

धनगर समाजाला काहीच मिळाले नाही. कारखाने आमच्याकडे नाहीत म्हणून आम्ही आरक्षण मागतो आहोत. दोन नेत्यांच्या सुतगिरीण्यास सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले. तसेच आमचा सरपंच होतो कारण गावचं आमचं आहे. सरकारने तत्काळ एसटीमधून आरक्षण द्यावे असे पडळकर यांनी ठणकावून सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.