पुणे- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार हे काही नवीन नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून इंदापूरमध्ये ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन लवकरच तुतारी फुंकणार असी चर्चा रंगली होती. या चर्चेवर अखेर हर्षवर्धन पाटील यांनी मौन सोडलं आहे. त्यांचं ठरलं असून पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याचे म्हणाले.
काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं. मात्र ते पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर दहा वर्षांत सविंधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर काँगेस, भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. इंदापुरातील सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची घोषणाबाजी केली. यावर कार्यकर्त्यांताआग्रह डावलता येणार नाही असं म्हणत त्यांनी तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले.
हर्षवर्धन पाटील यांनी आज सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता. आज शेवटचा जनता दरबार असून लोकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत.2014 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले आणि तेव्हा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांनी पाटलांचा पराभव केला. पुढे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटली, त्यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली तरही त्यांच्या पदरी निराशा आली.आता अजित पवार यांची राष्ट्रावादी महायुतीत आल्याने ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे राहण्याची चिन्हे आहेत. अशात भाजपकडून संधी न मिळाल्यास पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. दरम्यान, यापूर्वी इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी…..हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…. असं लिहण्यात आलं होतं. इंदापूरच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भर चौकात एक फ्लेक्स लागला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.