रस्त्याच्या मधोमध पिवळी लाईन दिसली तर व्हा सावध! पाहा काय असतो याचा अर्थ
तुम्हीही अनेकदा गाडी चालवत असाल आणि रस्त्यांकडे लक्ष देत नसाल तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्त्यावर असे अनेक फलक लावले जातात जे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असतात.
असेच एक चिन्ह म्हणजे रस्त्याच्या मधोमध दिसणारी 'पिवळी रेषा'. हा रस्त्याच्या सजावटीचा किंवा डिझाइनचा भाग नसून तो रस्ता सुरक्षा नियमांचा एक महत्त्वाचा भाग आहे. पिवळ्या लाईनचा उद्देश वाहने योग्य मार्गावर ठेवणे आणि अपघात टाळणे हा आहे, परंतु अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आज आम्ही तुम्हाला रस्त्यावर पिवळी रेषा दिसल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सांगणार आहोत.
रस्त्याच्या मधोमध पिवळी रेषा दिसली तर
वाहतूक कायद्यानुसार रस्त्यावर एक-दोन पिवळ्या रेषा केल्या जातात. गाडी चालवताना रस्त्याच्या मधोमध पिवळी रेषा काढलेली दिसली तर काळजी घ्या. ही रेष सामान्यत: विरुद्ध दिशेकडून वाहतूक येणाऱ्या रस्त्यांवर आढळते. दोन्ही दिशांची वाहतूक एकमेकांपासून वेगळी ठेवणे हा त्याचा उद्देश आहे.
याचे पालन न केल्याने अपघाताची शक्यता वाढते. विशेषत: समोरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यास असं घडतं. रस्त्यावर फक्त एक पिवळी रेषा दिसत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या लेनमध्ये राहून समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही पिवळ्या रेषेच्या पलीकडे जाऊन ओव्हरटेक करू शकत नाही. ही रेष सहसा सूचित करते की, येथे ओव्हरटेकिंगला परवानगी आहे, परंतु सावधगिरीने. जेव्हा पुढचा रस्ता स्वच्छ आणि सुरक्षित असेल तेव्हाच तुम्ही ओव्हरटेक करा.
रस्त्यावर दोन पिवळ्या रेषा दिसल्या तर काय?
दोन पिवळ्या रेषा अशा रस्त्यांवर आहेत जिथे वाहतूक दोन्ही दिशेने वाहते, परंतु ओव्हरटेकिंगला परवानगी नाही. रस्त्यावर दुहेरी पिवळी रेषा असेल तर याचा अर्थ तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ओव्हरटेक करू शकत नाही. ही एक कडक सुरक्षा चेतावणी आहे कारण ती रस्त्याची स्थिती, दृश्यमानता किंवा रहदारीमुळे धोकादायक मानली जाते. येथे ओव्हरटेक करणे बेकायदेशीर आहे आणि तसे केल्यास दंड किंवा अपघाताचा धोका होऊ शकतो.
निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो
पिवळी लाइन क्रॉस करण्याच्या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही लक्ष न देता ही लाइन ओलांडल्यास तुमचे वाहन समोरून येणाऱ्या वाहनांना थेट धडकू शकते. विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा दृश्यमानता कमी असताना, या लाइनचं पालन करणे अधिक महत्त्वाचे होते.
कोणत्या रस्त्यांवर पिवळी रेषा असते?
पिवळी रेषा प्रामुख्याने महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर आढळते, जेथे विरुद्ध दिशेने वेगाने जाणाऱ्या वाहनांची जास्त वाहतूक असते. ही लाइन दुहेरी ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवर असते. जिथे एक लेनने एक दिशा आणि दुसऱ्या लेनने दुसऱ्या दिशेचं ट्रॅफिक येतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.