व्हिडिओला लाईक केलं तरी चौकशी होणार; पुणे पोलिसांचा घाम फोडणारा आदेश नेमका काय?
पुणे : एकीकडे सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक करून ते शेअर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र, आता याच व्हिडिओंला लाईक करणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला डोळे झाकून लाईक करण्यांचे धाबे दणाणले आहेत.
पदभार स्वीकारताच घेतली होती नामचीन गुडांची परेड
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी आयुक्तालयात शहरातील नामचिन गुंडांची परेड घेत त्यांना सज्जड दम भरला होता. गजब प्रेम कहाणी! भाजप नेत्याची ४५ वर्षीय बायको हवलदाराच्या प्रेमात, 2 कोटींचे दागिने घेऊन फरार
गुंडांच्या सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
ज्यावेळी आयुक्तांनी या गुंडांची परेड घेतली होती. त्यावेळी अमितेश कुमार यांनी या सर्वांना रिल्स न बवण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही जणांनी रिल्स बनवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे समाजात हिरो म्हणून वावरणाऱ्या गुंडाच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. तसेच सराईत गुंड आणि ते वापरत असलेल्या सोशल मीडिया खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणेकरांचं गाऱ्हाणं मार्गी लागलं! विमानतळावर मिळणार टपरीवरच्या किमतीत चहा अन् पाणी
लाईक केलं तरी होणार चौकशी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही गुडांकडून वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, कोयते उगारून दहशत माजवणे आदी प्रकार करत त्याचे रिल्स बनवले जात होते. या व्हिडिओंना अनेकांकडून लाईक केले जात होते. मात्र, आता या प्रकारच्या व्हिडिओंना चुकून जरी लाईक केले तरी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येकाला विचार करुनच त्यावर लाईक, शेअर अन् कॉमेंट करावे लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.