Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ, किती वाढलेत भाव ? सोयाबीन, शेंगदाणा अन सूर्यफूल तेलाचे नवीन दर आताच चेक करा

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ, किती वाढलेत भाव ? सोयाबीन, शेंगदाणा अन सूर्यफूल तेलाचे नवीन दर आताच चेक करा
 

सध्या भारतात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. 7 सप्टेंबर पासून अर्थातच गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनंत चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. खरे तर गणरायाच्या आगमनापासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सव, विजयादशमी म्हणजेच दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण साजरे केले जाणार आहेत. पण अशा या सणासुदीच्या हंगामाच्या आधीच सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारे बातमी समोर येत आहे. यंदा ऐन फेस्टिवल सीजन मध्ये सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा फटका बसणार असे दिसत आहे. कारण की खाद्य तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

 
केंद्रातील सरकारच्या एका घोषणेमुळे खाद्य तेलाच्या किमती वीस रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाक घरातील बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

खाद्यतेल आयातीचे शुल्क वाढवले
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने देशभरातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यां पर्यंत वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही घोषणा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याआधीच ग्राहकांच्या खिशावर भार पडला आहे. मात्र ही घोषणा होताच महाराष्ट्रात खाद्य तेलाचे भाव कडाडले आहेत. खाद्यतेलाच्या किमती 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
आता आपण खाद्यतेलाचे नवीन दर चेक करणार आहोत. सरकारच्या या घोषणेनंतर सूर्यफूल शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाच्या किमती किलोमागे कितीने वाढल्या आहेत हे आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खाद्यतेलाच्या किमती कितीने वाढल्यात ?
मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीन तेलाची किमत 110 रुपये प्रति किलो वरून 130 रुपये प्रति किलो, शेंगदाणा तेलाची किंमत 175 रुपये प्रति किलो वरून 185 रुपये प्रति किलो अन सूर्यफूल तेलाची किंमत 115 रुपयांवरून 130 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे.

यामुळे गणेशोत्सव नवरात्र उत्सव दसरा दिवाळी या सणांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे घोषणा होताच अवघ्या काही तासात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याने भविष्यात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढणार की काय अशी भीती देखील व्यक्त होऊ लागली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.