Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांचे कार्यालय फोडणाऱ्या महिलेची ओळख पटली, धक्कादायक माहिती समोर

फडणवीसांचे कार्यालय फोडणाऱ्या महिलेची ओळख पटली, धक्कादायक माहिती समोर
 

मंत्रालयामध्ये घुसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड करणारी महिलेची ओळख पटली आहे.धनश्री सहस्त्रबुद्धे असे या महिलेचे नाव असून ती मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

महिलेने ती राहत असलेल्या सोसाटीमध्ये देखील तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात सुरक्षित ठिकाण मंत्रालय समजले जाते. मात्र, मंत्रालयात विना पास घूसून महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहि‍णींसाठी योजना काढत आहेत पण बहिणी तुमच्यावर नाराज आहेत हेच या तोडफोडीतून सिद्ध होते असे म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी कोणती बहीण नाराज असेल तर तिची नाराजी दूर करू असे सांगितले होते.

सोसायटीमध्येही तोडफोड

महिलेची ओळख पटल्यानंतर धनश्री सहस्त्रबुद्धे हिचा शोध घेण्यासाठी पोलिस तिच्या सोसायटीमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथील रहिवाशांनी धनश्री सहस्त्रबुद्धे ही मानसिक रुग्ण असून ती सोसायटीमध्ये देखील तोडफोड करत असे सांगितले. तसेच तीला सलमान खानसोबत लग्न करयाचे असल्याचे देखील सांगत असते असे सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.