Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षण केंद्राचा रविवारी भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, फडणवीस, ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे कार्यक्रम

राज्य उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षण केंद्राचा रविवारी भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, फडणवीस, ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे कार्यक्रम
 
 
राज्य उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षण केंद्राचा रविवारी भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, फडणवीस, ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे कार्यक्रम.  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाटण तालुक्यातील वाटोळे येथे उभारण्यात येणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई प्रशिक्षण केंद्राचा भूमीपूजन समारंभ रविवारी मुध्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या मान्यवरांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील अन्य मंत्री, सातारा जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिली.

या कयक्रमासाठी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार नितीन जाधव-पाटील, खा. श्रीमंत उदयनराजे भोसले, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. अरूण लाड, आ. प्रा. जयंत आसगावकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद जाधव- पाटील, आ. दीपक चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, उत्पादन शुल्कचे अपर आयुक्त यतीन सावंत, सह आयुक्त सुनील चव्हाण, सह आयुक्त विश्वानाथ इंदिसे, उप सचिव रविंद्र औटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथून आनलाईन पद्धतीने हा समारंभ होणार आहे. रविवारी दुपारी सव्वाबारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त चिंचाळकर आणि साताऱ्याचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.