बेशरमपणाची हद्द झाली...थेट बाप्पावरच दगडफेक!
देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या वाजत-गाजत निघत आहेत. जड अंत:करणाने भाविक गणेशाला शेवटचा निरोप देत असताना पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करीत आहेत.
उत्साहाच्या वातावरणादरम्यान महाराष्ट्रासह देशभरात दगडफेकीचा संतापजनक प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. या परिसरात किरकोळ वादातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत बाप्पाचं विसर्जन करणार नसल्याची भूमिका या गणेश मंडळाने घेतली आहे. त्यामुळे तब्बल दोन तासांपासून मिरवणूक एकाच ठिकाणी थांबून आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्यांचा घरांच्या गच्चीवरून व्हिडिओ व्हायरल झाला आहे . यात जण जखमी झाले असून परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
अशीच घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये गणपती विसर्जनासाठी गणेशमूर्ती घेऊन जाताना घडली आहे. हिंदुस्थानी मशिदीजवळील पुतळ्यावर काही मुलांनी दगडफेक केल्याची बातमी पसरली, त्यानंतर जमाव संतप्त झाला आणि दोन गटांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहल्ला कमिटी आणि पोलिसांच्या वतीने वंजारपट्टी नाका येथील हिंदुस्थानी मशिदीबाहेर मंडप उभारून गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.रात्री उशिरा 12 वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी घुंगट नगर येथून कामवारी नदीकडे नेले जात होते. गणेशाची मूर्ती वंजारपट्टी नाक्यावरून जात असताना हिंदुस्थानी मशिदीजवळ काही मुलांनी मूर्तीवर दगडफेक केल्याची बातमी आली. या घटनेमुळे पुतळा फोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, पोलीस त्याचा तपास करत आहेत. अश्याच घटना राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती विसर्जनादरम्यान घडल्या असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.