Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुकेश अंबानी यांची सुरक्षा कमालीची, सुरक्षा रक्षकांच्या कानात विशेष गॅझेट, किंमत आहे तरी किती?

मुकेश अंबानी यांची सुरक्षा कमालीची, सुरक्षा रक्षकांच्या कानात विशेष गॅझेट, किंमत आहे तरी किती?
 

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत. नुकतेच मुकेश अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चेंट आणि श्लोका मेहता यांनी मुंबईत लालबागचा राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होतेच, परंतु त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडेही होते. त्या सुरक्षा रक्षकांच्या कानात इयरबड्स दिसले. त्याच्यामागे तार होती. हे इयरबड्स सर्वांनीच घातले होते.



काय आहे ते गॅझेट

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा पथकातील इयरबड्ससारखे दिसणारे गॅझेट काय आहे? हा प्रश्न सर्वांना पडला होता. मुकेश अंबानीच नाही तर पंतप्रधानांसह व्हीव्हीआयपी असणाऱ्या लोकांच्या सुरक्षा रक्षकांकडे असे गॅझेट असते. त्याला Surveillance Security Acoustic Tube Ear Bud म्हणतात. हे वापरण्यास अगदी सोपे आहे. त्याला हातात घेऊन फिरावे लागत नाही. कानात ठेऊन हे एखाद्या वॉकी टॉकीसारखे काम करते. हे गॅझेट ब्लूटूथने कनेक्ट करता येते. एकदा हे कनेक्ट झाल्यावर कंट्रोल रुममधून त्याचे कंट्रोल सुरु होते. त्याच्या माध्यमातून ते कमांड घेऊ शकतात किंवा देऊ शकतात. पोलिसांकडे जसे वॉकी-टॉकी असते, तसेच हे असते.

किती आहे गॅझेटची किंमत

तुम्ही सुद्धा हे गॅझेट विकत घेऊ शकतात. त्याची किंमत फार जास्त नाही. दोन हजार रुपयापर्यंत ते मिळते. परंतु ते मनोरंजनासाठी उपयोगी नाही. सुरक्षेसाठी ते खूप चांगले आहे. पूर्वी गर्दीत सुरक्षा रक्षकांना वॉकी टॉकी वापरावे लागत होते. परंतु आता या गॅझेटमुळे हे काम सोपे झाले आहेत.

अनंत अंबानीच्या लग्नात वाकी टॉकीचा वापर

अनंत अंबानी यांच्या लग्नात नीता अंबानीसोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडे वाकी टॉकी दिसून आले होते. वॉकी टॉकी ज्या ठिकाणी गर्दी नसते, त्या ठिकाणी वापरु शकतात. परंतु लालबागच्या राजासारख्या गर्दीच्या ठिकाणी त्याचा वापर कठीण होतो. यामुळे हे वायरलेस गॅझेट वापरले जाते. जे हाताळण्यास सोपे आहे.

अंबानी कुटुंबाला Z+ सुरक्षा

अंबानी कुटुंबाला Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये एकूण 55 सुरक्षा कर्मचारी आहेत. ज्यात 10 हून अधिक NSG कमांडो आणि पोलिसांचा समावेश आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबच करते. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना ही सुरक्षा आहे. मुकेश अंबानी यांना धमकी मिळाल्यानंतर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.