Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंटिमेट सीनसाठी दारु पाजली अन् बलात्कार केला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

इंटिमेट सीनसाठी दारु पाजली अन् बलात्कार केला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 
 

गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री कास्टिंग काऊचविषयी बोलताना दिसत आहे. त्यांनी इंडस्ट्रीमधील अनेक पुरुष निर्माते आणि दिग्दर्शकांवर आरोप केले. आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.

तिचा हा अनुभव ऐकून इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. कास्टिंग काऊचचा अनुभव सांगणारी ही अभिनेत्री गेहना वशिष्ठ आहे. गेहनाने दैनिक भास्करला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव देखील सांगितला आहे.

दिग्दर्शकाने दिले कामाचे आश्वासन

'मी छत्तीसगडमधील एका छोट्या गावतून आले आहे. मी अभ्यासातही खूप हुशार होते. पण माझं लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला यावं लागलं. सुरुवातीला मला फक्त एक-दोन प्रोडक्शन हाऊसच माहिती होती. यामध्ये बालाजी प्रोडक्शनबद्दल खूप ऐकलं होतं. जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मला बालाजी टेलिफिल्म्सचा दिग्दर्शक म्हणून ओळख एक व्यक्ती भेटली आणि मला काम देण्याचं त्याने आश्वासनही दिलं' असे गेहना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'त्या व्यक्तीचं नाव प्रवीण जोहान असं होतं. तो बालाजी टेलिफिल्म्समध्ये दिग्दर्शक असल्याचे त्याने सांगितले आणि त्याच्या बोलण्याला मी मनावर गेतलं होतं. यानंतर त्या व्यक्तीने मला घरी बोलावलं. तिथे त्याने मला एका सीनसाठी डेमो द्यायला सांगितलं. तो म्हणाला की, चित्रपटात एक सीन आहे जिथे तुला दारु प्यावी लागते. त्यामुळे मला आधी डेमो दाखव. त्याने मला खूप दारु प्यायला लावली. त्यानंतर मी पूर्ण नशेत होते. याचाच फायदा घेऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला.'
इतर निर्मात्यांवर केले आरोप

या मुलाखतीमध्ये गेहनाने अनेक निर्माते आणि म्युझिक कंपन्यांवरही आरोप केले आहेत. इतकी वर्ष तिचं इंडस्ट्रीमध्ये शोषण होत असल्याचं गेहनाने सांगितलं आहे. पण तिला इंडस्ट्रीतून काढून टाकतील या भीतीने गप्प राहिली होती, असंही तिने यावेळी म्हटलं. दरम्यान गेहनाच्या या धक्कादायक अनुभवानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.