'ही' आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी विस्की; किंमत वाचून चाट पडाल...! दारुचा सुप्रसिद्ध प्रकार असलेल्या व्हिस्कीने भारतातील सर्व प्रांतांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे. प्रीमियम आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह, भारतीय व्हिस्की देखील तिच्या समृद्ध चव आणि स्वस्ततेसाठी ओळखली जाते. शहरी मध्यमवर्गाच्या बदलत्या पसंती आणि वाढत्या डिस्पोजेबल उत्पन्नामुळे बाजाराच्या वाढीला चालना मिळाली आहे. याव्यतिरिक्त, देशांतर्गत व्हिस्की ब्रँडचा उदय आणि प्रीमियम मिश्रणांची वाढती गरज पाहता, देशात व्हिस्कीची तीव्र मागणी वाढली आहे.
वर्षभरात 31.4 दशलक्ष बॉटल्स खप
मॅकडोवेल ही भारतात आणि परदेशात सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की आहे. 2023 मध्ये अर्थात गेल्या वर्षी या व्हिस्कीच्या विक्रमी विक्रीमुळे, भारताच्या सर्वात आवडत्या व्हिस्कीचा पुरस्कार देखील या विस्की प्रकाराने जिंकला आहे. या व्हिस्कीची गेल्या वर्षी 31.4 दशलक्ष बॉटल्स विकली गेली आहेत. तर २०२२ मध्ये त्याची विक्री २.१ टक्के होती. 1968 मध्ये लाँच केलेली, मॅकडॉवेलची नंबर 1 लक्झरी प्रीमियम व्हिस्की अनेक वर्षांपासून शीर्षस्थानी राहिली आहे.
रॉयल स्टॅग दुसऱ्या क्रमांकावर
रॉयल स्टॅग भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारतात रॉयल स्टॅगची विक्री 3 टक्के वाढून 27.9 दशलक्ष बॉटल्स पोहोचली आहे. त्यामुळेच तिने दुसरे स्थान मिळवले आहे. पेर्नोड रिकार्डच्या मालकीच्या या ब्रँडचा गेल्या दोन वर्षांत 24.6 टक्के खप वाढला आहे.
ऑफिसर्स चॉईस तिसऱ्या क्रमांकावर
अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सच्या मालकीची ऑफिसर्स चॉईस व्हिस्की मार्केटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये तिची विक्री 6 टक्क्यांनी घसरली असली तरी ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी 23.4 दशलक्ष बॉटल्स विकली गेली आहेत.
भारतात पहिल्या क्रमांकावर विकली जाणारी व्हिस्की मॅकडॉवेलची व्हिस्की आहे. जिची किंमत ही खूपच कमी आहे. ही व्हिस्की खूप आवडण्याचे मुख्य कारण तिची किंमत आहे. दिल्लीत या व्हिस्कीची किंमत 750 मिलीसाठी 400 रुपये आहे. तर मुंबईत तिची किंमत केवळ 640 रुपये इतकी आहे. म्हणूनच या व्हिस्कीला पार्ट्यांमध्ये चांगली पसंती दिली जाते.
'स्वस्त' किंमतीच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे हा ब्रँड आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीसह अनेक भारतीय धान्ये आणि माल्ट यांचे मिश्रण वापरले जाते. पण, कमी किमतीचा हा एकमेव दारूचा ब्रँड नाही, तर आणखी काही ब्रँड आहेत. या श्रेणीतील काही लोकप्रिय व्हिस्कीजमध्ये इम्पीरियल ब्लू सुपीरियर ग्रेन (750 मिलीसाठी 640 रुपये), रॉयल स्टॅग डिलक्स (750 मिलीसाठी 780 रुपये), बॅगपायपर डिलक्स (750 मिलीसाठी 550 रुपये) इत्यादींचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.