Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले

पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
 

पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटनांची मालिका सुरुच असतानाच पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीवर त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली, असली तरी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्राने धक्कादायक उलघडा झाला आहे.



मुलांच्या मुतारीमध्ये व उपहार गृहामागे अत्याचार

पत्रात म्हटले आहे की, एका नामांकित महाविद्यालयात 12 ते 15 दिवसांपूर्वी 5 मुलांनी एकत्रित येत महाविद्यालयातील प्रशासन इमारतीला लागून असलेल्या मुलांच्या मुतारीमध्ये व उपहार गृहाच्या मागे संबधित मुलींवर वेळोवेळी सामूहिक बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ शूटिंग करून ते विडिओ सर्वत्र प्रसारित करण्यात आल्याचे समजते. तसेच हे सर्व विडिओ महाविद्यालयाच्या प्रशासनातील लोकांनी संगनमताने व्हिडिओ सोशल मीडियात इतर लोकांना पाठवले.

समुपदेशकांनी प्रशासनाला माहिती देऊनही दखल घेतली नाही

बलात्कार व विडिओ शुटींगच्या घटना महाविद्यालयाच्या समुपदेशकांनी प्रशासनाला माहिती देऊनही त्याबद्दलची कोणतीही दखल ट्रस्टी, प्रभारी प्राचार्य, व उप-प्राचार्य यांनी घेतली नाही. दोन मुलींपैकी एक मुलगी इयत्ता अकरावी वर्गात शिकत आहे. ती विद्यार्थिनी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाची मुलगी आहे असेही समजते. बलात्कार करण्याऱ्या मुलांनी पीडित मुलीचे वडील (प्राध्यापक) यांना सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असेही समजते. त्यांना ते व्हिडिओ सुद्धा पाठविले असे समजते.

प्राध्यापक वडिलांना प्रशासनाने धमकावले
प्राध्यापक वडिलांनी या प्रकरणी तक्ताळ कायदेशीर कारवाई करावी, अशी वारंवार प्रत्यक्ष भेटून या सर्वांना विनंती केली असेही समजते. परंतु या सर्वांनी एकत्रित मिळून पीडित मुलीचे वडील (प्राध्यापक) यांना दमदाटी व धमकाविल्याचे समजते. तसेच आपण या घटनेबद्दल कुठेही वाच्यता करून नये तसेच संस्था व महाविद्यालयाच्या नावास आपल्याकडून बाधा आल्यास आपल्यावर संस्था तक्ताळ कारवाई करील याची नोंद आपण घ्यावी असेही समजते.

महाविद्यालय प्रशासनातील सर्वांनी मिळून पीडित मुलीचे वडील (प्राध्यापक) यांना या घटनेबाबत आपणाकडून जर संस्थेच्या अथवा महाविद्यालयांच्या नावलौकिकास काही बाधा आल्यास आम्ही आपल्यावर कारवाई करू व आपण येथील सेवक आहात याचे सुद्धा आपण भान ठेवावे असे धमकाविल्याचे समजते. संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मुलीने केलेले वाईट कृत्य अतिशय गंभीरपणे घेतले आहे. आपण जर संस्थेच्या अथवा महाविद्यालयांच्या विरोधात बाहेरच्या कोणत्याही घटकांस माहिती दिल्यास वाडियांनी आम्हाला आपल्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आपण नोकरीस मुकाल याची दखल आपण घ्यावी असे धमकाविल्याचे समजते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.