मुंबई: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, प्रेयसीने पळून येण्यास नकार दिल्यानं तरुणानं चौथ्या मजल्यावरून उडी मारून प्रेयसीसमोरच आत्महत्या केली आहे. ही घटना दावडी लोटस पार्क परिसरात घडली आहे.
स्वप्निल अनिल धुमाळ असं या प्रियकराचं नाव आहे, तो पन्हाळा तालुक्यातील राक्षीचा रहिवासी होता. तर त्याची प्रेयसी रत्नागिरीमध्ये राहाते. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर शाहुवाडी तालुक्यातील एका संस्थेमध्ये एक वर्षापूर्वी स्वप्निल आणि त्याच्या प्रेयिसीचे प्रेमाचे सुत जुळले होते. स्वप्निल हा कोल्हापुरातील एका दुकानात काम करतो.
दरम्यान या तरुणीच्या प्रेयसीची बहीण ही कल्याणध्ये राहाते, त्यामुळे ती देखील आपल्या बहिणीसोबत राहण्यासाठी कल्याणला आली होती. स्वप्नील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी कल्याणला आला होता, मात्र त्यांचं प्रेमप्रकरण तिच्या बहिणीला कळलं. त्यानंतर बहिणीने दोघांना समजावून सांगितलं, तसेच याबाबत तीने प्रियकराच्या नातेवाईकांना देखील कल्पाना दिली.
त्यानंतर तो पु्न्हा एकदा आपल्या प्रेयसीला भेटायला कल्याणला गेला, तो तिला आपण पळून जाऊ असं म्हणत होता, मात्र घाबरलेल्या प्रेयसीनं पळून येण्यास नकार दिला. तीने आतून घराचा दरवाजा बंद करू घेतला. ती दार उघडत नसल्याचा राग आल्यानं त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.