कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण, माजी खासदारांनी मारहाण केल्याचा मुल्ला यांचा आरोप
कवठेमहांकाळ (जि. सांगली) : येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील याच्या समर्थकांनी आज, शुक्रवारी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली.
यावेळी संजयकाका पण उपस्थित होते. त्यांनीही मला मारहाण केल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. तसेच माझ्या ७६ वर्षांच्या आईला ढकलून दिले आणि कुटुंबीयांना पण मारहाण केल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. ही घटना आज सकाळी साडे सातच्या सुमारास घडली.
कवठेमहांकाळ येथे सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.