आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक, काय आहे कारण?
पोलिसांचा गैरवापर करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस हिटलरचे राजकारण करत आहे. देशभक्त स्वयंसेवकांवर अत्याचार केले जात आहेत.
बंगळूर : पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर छापा टाकून संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपने सोशल नेटवर्किंग साईट 'एक्स'वर पोस्ट केली आहे की, पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर रात्रभर छापा टाकला आणि संघटनेच्या प्रचारकांना मारहाण केली, हे अक्षम्य आहे.
संघाच्या कार्यालयावर विनाकारण झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे भाजपने म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात अराजकता वाढली आहे. ज्यामुळे हिंदू भीतीच्या वातावरणात आहेत.पोलिसांचा गैरवापर करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस हिटलरचे राजकारण करत आहे. देशभक्त स्वयंसेवकांवर अत्याचार केले जात आहेत. नागमंगला दंगलीत हिंदू कार्यकर्त्यांनी आरएसएस नेत्यांच्या अटकेचा निषेध केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.