'महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होणार..!' बड्या नेत्याचं सूचक विधान
महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीच्या चर्चेला उधाण आले आहे. या भेटीनंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील आगामी निवडणुका आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुफडा साफ होणार आहे. अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम दिसून येईल, मी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रचार सभांसाठी येणार असल्याचेही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.
हरीयाणाच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना सत्यपाल मलिक म्हणाले, "हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास 60 जागा मिळतील. तर भाजप फक्त 20 जागा जिंकेल. 2019 मध्ये पुलावामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मी गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत. पुलवामा हल्ल्यात आपले जवान कसे मारले गेले, हे देशातील जनतेला कळलं पाहिजे. आपले जवान शहीद होण्याला जबाबदार कोण आहेत, हे कळलं पाहिजे, हे लोकांच्या समोर आलं पाहिजे.तसेच, भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग सुरू आहे. पुलवामा हल्ल्याच्या तिसऱ्याच दिवशी भाजपने या घटनेचं राजकारण करायला सुरूवात केली. त्यामुळेच लोकांनी मतदान करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असही त्यांनी यावेळी नमुद केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.