Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
 

अंथरुणात लघुशंका केल्याच्या रागातून सावत्र आईनं 5 वर्षाच्या मुलीला उलथनं तापवत गुप्तांगासह गाल, ओठ आणि गळ्याजवळ चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे हा संतापजनक प्रकार घडलाय.

शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सावत्र आई या चिमुकलीच्या जीवावर उठल्याचं दिसून आलं. उलथन्यानं चटके दिल्यानं मुलीचा चेहरा गंभीर भाजला आहे. ही घटना घडली तेंव्हा मुलीचे वडील घरात नव्हते. हा प्रकार समजताच मुलीचे वडील शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सावत्र आईनं चिमुकलीला दिले डाग!

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीमध्ये सावत्र आईनं पाच वर्षाच्या चिमुकलीला अंथरुणात ओलं केल्याच्या रागातून उलथन्यानं डाग दिले आहेत. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. शुभम मोकिंदराव मगरे हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह आणि दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून राहतात. शुभम व पुजा यांचे दुसरे लग्न झाले असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून आपत्य आहेत. शुभम कामानिमित्त बाहेर गेले असता पुजा मगरे यांनी पाच वर्षाच्या मुलीला अंथरुणावर लघुशंका केली म्हणून उलथने तापवत चटके दिले आहेत. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं असून अंथरुण ओलं केल्याच्या रागातून मुलीला पोळवल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुलीच्या अंगावर जखमा

पाच वर्षाच्या या चिमुकलीनं अंथरुण ओलं केल्याचा राग आल्यानं पूजा मगरे यांनी उलथने तापवत मुलीच्या गालावर, ओठांवर, तोंडावर, गळ्याजवळ गुप्तांगाजवळ उलथने तापवुन चटके दिले आहेत. यावेळी या मुलीचे वडील घरात नव्हते. उलथन्यानं पोळवल्यामुळं मुलीच्या चेहऱ्यावर, अंगावर जखमा झाल्या आहेत. हे पाहिल्यावर मुलीच्या वडीलांनी शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 78 वर्षीय नराधमास पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील बालाजी नगरमध्ये हा प्रकार घडलाय. मधुकर पीराजी थिटे असं या आरोपीचे नाव असून घराशेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर मधुकर थिटे याने लैंगिक अत्याचार केले. त्या मुलीनेही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला मारण्याची धमकी दिली. सात वर्षांच्या त्या मुलीला वेदना व्हायला लागल्यावर तीनंही बाब तीच्या आजीला सांगितली. त्यानंतर या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता मधुकर थिटेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच स्पष्ट झालं. आता या मुलीची प्रकृती व्यवस्थित असून मधुकर थिटेला अटक करण्यात आलीय.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.