वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा दुचाकीवरच हृदयविकाराने मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना
सुट्टी असल्याने पतीची तब्येत दाखवण्यासाठी दवाखान्यात जात असताना दुचाकी चालवणाऱ्या ३६ वर्षीय पत्नीचा चक्कर येऊन पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयूरी देवेंद्र कर्पे-राऊत असे या मृत महिलेचे नाव आहे. या धक्क्याने त्यांच्या पतीची तब्येतही बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
त्यांचे पती देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण विभाग येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असून मयुरी करपे या आकाशवाणी चौकातील जिल्हा महिला बालकल्याण विभागात कार्यरत आहेत. शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी मयुरी करपे यांनी दुपारी पती देंवेंद्र यांना एका खाजगी रुग्णालयात बीपीचा त्रास होत असल्याने त्यांना तपासण्यासाठी आणले होते.
याच वेळी मयुरी करपे यांची प्रकृती खराब
झाल्याने त्या कोसळल्या. त्यानंतर तत्काळ दोघं पतिपत्नीला खाजगी
रुग्णालयात नेले. त्याठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे. तर
मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांना
अश्रू अनावर झाले होते. दरम्यान शवविच्छेदनकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांसह सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.