Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीड लोकसभा मतदारसंघात धुरळा उडवणारे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द

बीड लोकसभा मतदारसंघात धुरळा उडवणारे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द
 

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात धुरळा उडवून देणारे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग बप्पा याांनी बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय खेचून आणला होता.

त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पण आता त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी सदर याचिका दाखल केली आहे. आज याचिकेवर न्या. ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली. 24 ऑक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल.

याचिकेतील आक्षेप काय?

काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे होते. पण निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ वाढवण्यात आले. या गलथान कारभारामुळे 4,261 मतदार मतदानापासून वंचित राहिले. या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे. त्यामुळे ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली.
माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेले नाही. वैध असणारे 1156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे आहे.

प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या आदी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. ॲड. शशिकांत ई. शेकडे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांना ॲड. पृथ्वीराज ए. ढाकणे, ॲड. बी. एस. बोडखे ,ॲड. विशाल थावरे, ॲड.आर.जी.नरवडे व एन.एस. राठोड यांनी सहकार्य केले.
बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहे, पण त्यांनी या पदाचा शपथपत्रात उल्लेख केला नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

एकूण झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक

बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए,140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 मतदान केंद्र अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.