पर पुरुषाबरोबर शरीर संबंध ठेव, नाहीतर...; मित्राच्या बायकोला धमकी, महिला पोलीस निलंबित
पुण्यामध्ये एका महिला पोलीस शिपायाने मित्राच्या बायकोला धमकावलं, तिला पर पुरूषासोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर त्या महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलेलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मित्राच्या पत्नीला परपुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेव, तसं नाही केलं तर तुला करंट देऊन मारू, असे म्हणत धमकावणारी पुण्यातील वादग्रस्त महिला पोलीस शिपाई अनघा ढवळे आहे. तिला सध्या निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अनघा सुनील ढवळे, असं या महिला पोलीस शिपायाचं नाव आहे. ती कोथरूड वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनघाला निलंबित करण्यात आलंय.
मित्राच्या बायकोला धमकावलं
अनघा ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषाबरोबर संबंध ठेव. तू जर असं केलं नाही, तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार मारू. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. तसंच आम्ही एक सामाजिक सोशल फाउंडेशन चालवतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यामध्ये आमचा एक 9 करोडचा व्यवहार झालाय. यात तुझ्या नवऱ्याला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहे, अशी धमकी तिने मित्राच्या बायकोला दिली होती.
महिला पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
जर तु आमचं ऐकलं नाही, तु असं केलं नाही तर तुला ठारू मारू. तुला करंट देतो, असं म्हणत तिने पीडित महिलेला धमकावलं. या सगळ्या प्रकरणात पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. याप्रकरणी अनघा ढवळे या महिला पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.