अरबपतीने सलमानला घालायला दिलं हिऱ्याचं घड्याळ; 714 हिऱ्यांची किंमत वाचून डोळे चक्रावतील
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडे सलमान खानने अमेरिकन लक्झरी घड्याळ आणि ज्वेलरी ब्रँड जेकर अँड कंपनीचे मालक जेकब अरबो यांची भेट घेतली.
सलमान खान आणि जेकब यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जेकबने सलमान खानला त्यांची 'बिलेनियर III' नावाचे लक्झरी घड्याळ घालायला दिले. या घड्याळाची किंमत 167 कोटी रूपये असून त्यावर 714 पांढेर हिरे लावलेले आहेत.
जेकब अरबो यांनी शेअर केला व्हिडिओ
जेबक यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेकब सलमान खानला स्वत:च्या हाताने हातात घड्याळ घालताना दिसत आहे आणि गळाभेट देताना दिसत आहे. नंतर कॅमेराकडे हात दाखवत आलिशान घड्याळ फ्लाँट केले. तसेच जेकब यांनी व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिले की 'मी कधीच कोणाला
'बिलियनेअर' घालू देत नाही, पण सलमान इतरांपेक्षा वेगळा आहे.' या व्हिडिओवर
चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांनी केला कमेंट्सा पाऊस
एका यूजरने लिहिले की,'भाई फॉर अ रिझन ' तर अवेज नावाच्या यूजरने कमेंट केली की, 'द कॅप्शन सेज् इट ऑल ' तर तिसऱ्या युजरने कमेंटमध्ये भाई लिहिले आणि खुप हार्ट इमोजी दिले आहेत. तर एका यूजरने तर चक्क आयलव्हयू लिहिले आहे. तर एकाने लिहिले की, 'सलमानने हे घड्याळ घालून त्याची किंमत वाढवली.'
या सेलेब्सकडे आहे लक्झरी घड्याळ
क्रिस्टियानो रोनाल्डोसह अनेक सेलिब्रिटी जेकब अरबो बिलियनेअर III घालतात. ही एक लक्झरी घड्याळ असून त्याची किंमत 167 कोटी रुपये आहे. यात 152 पांढरे कट हिरे आणि 76 हिरे जडलेले आहेत. या घड्याळाच्या ब्रेसलेटमध्ये 504 पांढरे कट हिरे आहेत.हे 216 कॅरेट घड्याळ देखील पिवळे हिरे जडलेले आहे. मॅडोना, रिहाना आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जेकब अरबो घड्याळ आणि दागिने घालतात.सलमानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याचा 'सिकंदर' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादास करत आहेत आणि साजिद नाडियादवाला निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमानशिवाय रश्मिका मंदान्ना, प्रतिक बब्बर आणि सत्यराज देखील दिसणार आहेत. पुढच्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.