Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

7 वर्षांच्या मुलीवर 78 वर्षांच्या नराधमाचा अत्याचार, गळ्याला चाकू लावत.

7 वर्षांच्या मुलीवर 78 वर्षांच्या नराधमाचा अत्याचार, गळ्याला चाकू लावत.
 

बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवर झालेलया अत्याचाराने अख्ख राज्य हादरलं. त्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर मुल, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

यामुळे संतापाचे वातावरण आहे. मात्र याचदरम्यान पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार झाल्याचेही उघड झालंय. दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आलंय. विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून हा प्रकार उघडकीस आला असून अख्खं शहर हादरलं आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्या मुली वासनेच्या बळी ठरल्या आहेत.

त्यापैकी पहिल्या घटनेत एका 78 वर्षांच्या नराधम वृद्धाने अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मधुकर पिराजी थिटे असे 78 वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.या घटनेत सातवर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध नराधमाने चिमुकल्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिला घरी नेलं. तेथे नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला. तसेच, घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.