Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सापापेक्षाही खतरनाक भारतातील ' या '3 महिला! यांच्याकडे आहे जगातील सर्वांत धोकादायक विष

सापापेक्षाही खतरनाक भारतातील ' या '3 महिला! यांच्याकडे आहे जगातील सर्वांत धोकादायक व
 

आंध्र प्रदेश पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे. या तिघींकडून जगातील सर्वांत धोकादायक विष मानलं जाणारं सायनाईड जप्त करण्यात आलं आहे. या महिलांच्या अटकेनंतर ज्या गोष्टी समोर आल्या, त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

या महिलांनी एक मोठा कट रचला आणि खून केले. या तीन महिलांनी आतापर्यंत किमान चार जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी तेनाली जिल्ह्यातून या तीन महिलांना इतर तीन महिलांसह चार जणांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तिन्ही आरोपी महिला 2022 पासून खून करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तिन्ही महिला सर्वांत आधी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून तिचा विश्वास जिंकायच्या, नंतर त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी त्यांना सायनाईड विष मिसळलेले ड्रिंक प्यायला द्यायच्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

2022 साली केला पहिला गुन्हा

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या सीरियल किलर महिलांनी सर्वांत आधी जून 2022 मध्ये पहिला गुन्हा केला होता. या तिघींनी नुकतीच नागूर बी. नावाच्या महिलेची हत्या केली आणि त्यानंतर आणखी दोन महिलांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या बचावल्या, असंही पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी रजनी, व्यंकटेश्वरी आणि रामनम्मा या तीन महिलांची ओळख पटवली आहे. या तिघी तेनाली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदियाला व्यंकटेश्वरी ही आरोपी महिला या पूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. मुख्य आरोपी व्यंकटेश्वरी ही यापूर्वी स्वयंसेवक म्हणून काम करत होती. चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी ती परदेशातही गेली होती आणि तिथे सायबर गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग होता.

मित्राकडून विकत घेत होत्या विष
या सर्व महिला त्यांच्या एका मित्राकडून सायनाईड विकत घेत होत्या. यांचा मित्र एसी मेकॅनिक आहे. तो सोन्याचे दागिने बनवणाऱ्यांकडून सायनाईड विकत घ्यायचा. पोलिसांनी त्यांच्याकडून सायनाईड आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.

तेनाली जिल्ह्यातील घटनेने खळबळ उडाली आहे. तसेच केरळमधील सायनाईड वापरून केलेल्या हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. केरळमध्ये एका महिलेने 14 वर्षात पतीच्या कुटुंबातील सहा जणांचे सायनाईड देऊन खून केले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.