Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेची हत्या करुन 30 तुकडे केले अन् फ्रिजमध्ये ठेवले, घटनेने देशभरात खळबळ

महिलेची हत्या करुन 30 तुकडे केले अन् फ्रिजमध्ये ठेवले, घटनेने देशभरात खळबळ
 

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना आता बंगळुरूतून अशीच घटना घडल्याचं वृत्त सोर आलं आहे. बंगळुरू येथील एका महिलेची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. मृत तरुणी ही 26 वर्षीय असून बंगळुरूतील मल्लेश्वरम येथील एका निवासी भागात राहत होती. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ती राहत होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेची हत्या जवळपास 15 दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले आढळून आले. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आपला तपास सुरू केला आहे.

ही घटना बंगळुरूतील मल्लेश्वरममधील वायलीकावल पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येमागचा हेतू किंवा संशयितांच्या बाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पीडित मुलगी दुसऱ्या राज्यातील निवासी असून ती बंगळुरूत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून घरातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हत्या झाल्याचं उघड झालं. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिला ही तीन महिन्यांपूर्वीच या इमारतीत भाड्याने रहाण्यासाठी आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीम, श्वानपथक आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती

2022 मध्ये दिल्लीतील मेहरौली येथे श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची हत्या करण्यात आली होती. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे 36 तुकडे आरोपीने केले होते. आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे अवयव मेहरौलीच्या जंगलात फेकून दिल्याचं उघड झालं होतं. या घटनेने केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी आफताब पूनावाला हा अटकेत असून दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.