Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिसताय छोटी अंडी, पण विकत घ्यायला गेला तर 2bhk फ्लॅट विकला तरी येणार नाही!

दिसताय छोटी अंडी, पण विकत घ्यायला गेला तर 2bhk फ्लॅट विकला तरी येणार नाही!
 

अनेकदा जेवताना, या जेवणाची किंमत किती हा विचार मनात येत नाही पण असा एक पदार्थ आहे ज्याची किंमत पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल..गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, अल्मास कॅविअर हे जगातील सर्वात महाग अन्न आहे.

बहुतेक लोक माशांच्या अंड्यांना कॅविअर समजतात. या अंड्यांची किंमत लक्झरी कार आणि फ्लॅट इतकी आहे. हे माशांच्या दुर्मिळ जातीपासून मिळतं आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जगात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जगातील सर्वात महागडं अन्न म्हणजे फळ किंवा भाजीपाला नसून खास प्रकारची अंडी आहेत. ही एक किलो अंडी विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.

ही समुद्रातून काढली जातात आणि काही ठिकाणीच आढळतात. यामुळेच त्यांची किंमत खूप जास्त आहे. ही खास अंडी आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. कॅविअर हे माशांच्या दुर्मिळ प्रजातींच्या अंडाशयातून काढली जातात. कॅविअरचे बरेच प्रकार आहेत, त्यापैकी अल्मास कॅविअर सर्वात महाग आणि दुर्मिळ मानला जातो.
अल्मास कॅविअर हा प्रकार इराणमधील अल्बिनो स्टर्जन माशाच्या अंडाशयातून काढला जातो. या माशाचं वय 60 ते 100 वर्षं आहे. त्याचा रंग काळा आहे, त्यामुळे या प्रकाराला काळं सोनं असंही म्हणतात. अल्मास कॅविअरची किंमत कोटींमध्येही असू शकते, कारण दुर्मिळ अल्बिनो स्टर्जन मासा लिलावात कित्येक कोटींमध्ये विकला जातो. हे कॅविअर देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, अल्मास कॅविअरमध्ये व्हिटॅमिन बी 12, ओमेगा -3 फॅटी ऍसिड, झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसह पोषक तत्वांचा समावेश आहे. अल्मास कॅविअरमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अल्मास कॅविअर मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
अल्मास कॅविअरमध्ये चांगल्या प्रतीची प्रथिनं देखील असतात. जी शरीराच्या स्नायूंसाठी फायदेशीर ठरू शकतात‌. कॅविअरमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. कॅविअरमध्ये असलेली पोषक तत्वं, शरीरातील ऊर्जा कायम राखण्याचं आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करतात. अल्मास कॅविअर सेवन केल्यानं स्मरणशक्ती सुधारू शकते. त्वचा सुधारण्यासाठी ही खास अंडी फायदेशीर असतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.