Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेजर स्फोटांमध्ये हेजबोला या दहशतवादी संघटनेचे 2750 सदस्य जखमी झाले आहेत तर 14 जणांचा मृत्यू

पेजर स्फोटांमध्ये हेजबोला या दहशतवादी संघटनेचे 2750 सदस्य जखमी झाले आहेत तर 14 जणांचा मृत्यू 
 

इस्रायल आणि शेजारी असलेल्या लेबनॉन यांच्यातील सुप्त युद्ध आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे. मंगळवारी लेबनॉनमध्ये (दि. १७ सप्टेंबर) ठिकठिकाणी झालेल्या पेजर स्फोटांमध्ये हेजबोला या दहशतवादी संघटनेचे २,७५० सदस्य जखमी झाले आहेत.

तर आठ लोक मारले गेले. संदेशवहनासाठी वापरले जाणारे छोटेसे पेजर इतक्या लोकांच्या मृत्यूसाठी कसे कारणीभूत ठरू शकते? कोणताही मोठा हल्ला न करता, केवळ एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे इतक्या लोकांवर हल्ला करण्याची ही पद्धत कशी काय राबवली गेली? पेजरचा उदय कधी झाला? आणि भारतात पेजरचा वापर कधी झाला होता? याबद्दल जाणून घेऊ.

पेजर म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरले गेले?
पेजर हे एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ज्याला बीपर असेही म्हटले जाते. पेजरच्या छोट्याश्या स्क्रिनवर छोटे संदेश आणि एखाधा क्रमांक पाठविणे किंवा मिळवणे, यासाठी याचा वापर होतो. रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे पेजरवरून मेसेज पाठविणे आणि मिळवणे शक्य होते. हे मेसेज एखादा क्रमांक किंवा अल्फान्यूमेरिक (लिखित) स्वरुपात असतात. पेजरवर असलेल्या स्किनवर मेसेज दिसून येतो.

पेजवर मेसेज आल्यानंतर व्हायब्रेशन, टोन किंवा बीप वाजते. त्यामुळे त्याला बीपर म्हटले जायचे. एखाद्या कलबलाट असलेल्या ठिकाणी किंवा ज्याठिकाणी शांतता बाळगणे अनिवार्य आहे, जसे की रुग्णालय वैगरे ठिकाणी पेजरचा प्रामुख्याने वापर केला जातो.
भारतात पेजर कधी वापरले गेले?

भारतात १९९० च्या दशकात आणि २००० सालापर्यंत पेजरचा वापर झाला होता. भारतात त्यावेळी अनेक व्यावसायिक, प्रोफेशनल्स जलद संपर्क साधण्यासाठी पेजरचा वापर करत होते. भारताव्यतिरिक्त इतर देशांत कुरीयर सुविधा पुरविणारे, डॉक्टर्स, नर्सेस आणि आप्तकालीन सेवा देणारे लोक पेजरचा वापर करत. काही ठिकाणी सेल्युलर नेटवर्कला पर्याय म्हणून पेजरचा वापर केला जात होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.